अतीव मोदाने दीपावलि साजरी करताना अनेकदा 'हे असेच का ?' हा प्रश्न आबालवृद्धांना सतावतो. दीपपर्वाशी संबंधित असलेल्या अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. त्यापैकी काही अशा आहेत.
कामरुप देशात नरकासुराचे अत्याचार वाढत्या प्रमणात होते. देव आणि मानव यांना त्याच्या मगरमिठीतून सुटण्याची इच्छा होती. तेव्हा भगवान विष्णूनी नरकासुरास आपल्या सुदर्शन चक्राचे भक्ष्य वनविले. परंतु अंतसमयी चलाख नरकासुराने भगवंताकडे एक वर मागितला.
"माझ्या मृत्युदिनी महितलावर उत्सव साजरा व्हावा आणि घरोघरी दीपकांची आरास व्हावी !"
परमेश्वरानं म्हटले, "तथास्तु !"
हाच तो दिन, आपण त्यास 'नरकचतुर्दशी' म्हणतो.
या दिवशी सूर्योद्यापूर्वी सुगंधी द्रव्ये अंगास लावून ऊन पाण्याने मंगल स्नान करण्याचा प्रघात आहे. असे न केल्यास आपण स्वर्गात न जाता नरकात जाऊ अशी कल्पना आहे. हा दीपावलीचा आरंभ दिन आहे.
नरक चतुर्दशी

0 अभिप्राय:
Post a Comment