Saturday, March 12, 2011
हुस्नबानू व ढोंगी साधू
Friday, March 11, 2011
हुस्नबानूची कथा
परोपकारी राजा हातिम
हातीमताई
लेखक - श्री प्रभाकर नारायण तुंगार
प्रकाशन - सेंट्रल प्रकाशन
Wednesday, March 9, 2011
बंडूला पहिले बक्षीस
’निश्चयाने बळ, तुका म्हणे तोचि फळ.’
Saturday, December 1, 2007
Friday, November 30, 2007
पहारेकरी (चंपक - सप्टेंबर २००७)
Thursday, July 26, 2007
सिंहासन बत्तिशी - कथा दुसरी - भाग ८
परत आतून धीरगंभीर आवाज आला ---
मित्रदोही कृतघ्नश्च तथा विश्वासघातक: ।
त्रयस्ते नरकं यांति यावश्चंद्र दिवाकरी ॥
मित्राचा घात करणरा, उपकार न स्मरणारा, विश्वास्घात करणारा, हे तिघे जोपर्यंत हे चंद्रसूर्य प्रकाशत आहेत तोपर्यंत नरकांत राहतात.
आतां विजयपाल फक्त 'रा' 'रा' असेच म्हणूं लागला. सारेजण पडद्याकडे उत्सुकतेनें बघत होते. सर्वांच्या नजरा आदरामिश्चित कौतुकानें भारल्या होत्या. राजाचे डोळ्यात आनंदाश्रु उभे होते. तेवढ्यात स्वर उमटले ----
राद्वांतः सर्व शास्त्रणामयं न कलुर्ष परम ।
विश्वास्गातात्पुत्यं च न परोपकृतै: परम ॥
सर्व शास्त्रांचा सिद्धांत आहे की, विश्वासघाताएवढे मोठे पातक नाहीं व परोपकाराएवढें दुसरें कोणातेंच पुण्य नाही.
हा श्लोक ऐकतांच राजपुत्राचे वेड एकदम नाहीसें झालें, त्यांने सर्वांना प्रणाम केला व रानांत घडलेली हकीकत सर्वांसमक्ष वडिलांना सांगितली. राजा मोठ्या आनंदाने पडद्याकडे वळून म्हणाला, 'हे मुली - तू तर गोषा सोडून कुठेही जात नाहीस; मग तुला हे सर्व कसें काय कळाले ते मला मांग़ ! माझी फार इच्छा आहे - मी तुझ्यावर एकदम खुष आहे.'
Tuesday, July 24, 2007
सिंहासन बत्तिशी - कथा दुसरी - भाग ७
झाले ! प्रधनानें निरोप सांगितल्यानंतर सर्व व्यवस्था करण्यात आली. 'ससेमिरा' या नांवाचा जप करणाऱ्या विजयपालला तिच्यासमोर आणून बसविलें. पडद्याच्या आंतून आवाज आला --
सदभावप्रतिपन्नां वंचने का विदग्धता ।
अंकभारुह्य सुप्तानां हंतु: किं नाम पौरुषम ॥
हे युवराजा, तुझ्यावर ज्यांने पूर्ण विश्वास ठेवला त्याचा विश्वासघात करण्यांत कोणते चातुर्य आहे ? आपल्या मांडीवर विश्वासानें मान ठेवलेल्याचा प्राण घेण्यांत कोणता पराक्रम आहे ?
हा श्लोक ऐकतांच राजपुत्र थोडा सांवरुन बसला. त्यांने 'स' हे अक्षर सोडून दिले व तो 'सेमिरा' असें बडबडू लागला. तेवढ्यात आंतून परत आवाज आला --
र्सेंतुं गत्वा समुद्रस्य गंगासागर संगमम ।
ब्रह्मघ्नोऽपि विमुच्येत मित्रद्रोही न मुच्यते ॥
सेतुबंध रामेश्वराला अथवा गंगा आणि सागर यांचा जेथें संगम झाला त्या तिर्थक्षेत्राला गेलं असतां ब्रह्महत्या करणारादेखील त्या पापापासून मुक्त होतो. परंतु मित्रद्रोही मात्र मित्रदोहाच्या पापापासून कोठेंही मुक्त होऊं शकत नाही.
एवढें ऐकल्यावर राजपुत्र बराच शांत झाला. राजाही थोडा आनंदित दिसू लागला. असलेले लोक वाहवा ! वाहवा !! म्हणूं लागले. राजपुत्र आतां 'मिरा' 'मिरा' एवढी दोन अक्षरेच म्हणूं लागला.
सिंहासन बत्तिशी - कथा दुसरी - भाग ६
इकडे त्याचा घोडा नगरांत जाऊन पोहोंचला होता. घोडा एकटाच आलेला पहातांच व्याकुळ झालेला राजा त्याच घोड्यावर बसून विजय्पालाच्या शोधावर निघाला. रानांत त्याल एक वेडा दिसला. पण निरखून पहातांच, तो आपलाच पुत्र आहे हें राजानें ओळखलें. विजयपालाला घेऊन राजा घरीं आला. अनेक वैद्य, हकीम आले. खूप औषधोपचार केले, पण राजपुत्राला गुण येईना. उलट 'ससेमिरा' ह्या नावांचे वेड वाढतच चालले. खिन्न झालेला राजा प्रधानाला म्हणाला, 'आज माझे गुरु शारदानंद असते तर त्यांनी याला बरे केले असते.' प्रधान गांवात दवंडी देऊन बघू या - शारदानंदांसारखा एखादा विद्वान कदाचित युवराजांना बरें करूं शकेल.'
बुडत्याला काडीचा आधार वाटतो त्याप्रमाणे राजाला या सूचनेनें थोडा आधार वाटला. त्यानें ताबडतोब दवंडी देण्याचा हुकुम सोडला. इकडे प्रधान घरी आला व शारदानंदांना नमस्कार करून त्यांने सर्व हकीकत सांगितली.
शारदानंदांनीं समाधी लावली. अंतर्ज्ञानानें त्यांना राजपुत्राची सारी हकीकत समजली. थोडा वेळ गेला. गुरुनें डोळे उघडलेले पाहतांच प्रधानानें परत प्रणाम केला. हंसतच शारदानंद म्हणाले, 'वत्सा, तूं राजाला जाऊन सांग़, माझी कन्या फार चतूर आहे. ती राजपुत्राला बरें करील. मात्र ती पडदानशील असल्याने आंतच राहून बोलेल.'
